कर्जमाफीच्या आठव्या यादीत २,७९७ शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:46 IST2018-06-03T00:46:22+5:302018-06-03T00:46:22+5:30
राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे.

कर्जमाफीच्या आठव्या यादीत २,७९७ शेतकरी
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची आठवी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २,७९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना चार कोटी ७८ लाख ५२ हजार रु.चा लाभ मिळणार आहे. यामध्ये २,६७३ शेतकरी हे नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत. कर्जमाफीची रक्कम साधारणत: उद्या, सोमवारी जिल्हा बॅँकेच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची जून २०१७ मध्ये राज्य सरकारने घोषणा केली होती. शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. जिल्ह्यातून सुमारे साडेचार लाख खातेदारांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले होते. कर्जमाफीच्या निकषानुसार प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र शेतकºयांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सात याद्यांच्या माध्यमातून जिल्हा बॅँक व राष्टयीकृत बॅँकेच्या एक लाख ८५ हजार ५०० खातेदारांना ३५९ कोटींची कर्जमाफी झालेली आहे.
गेले दीड-दोन महिने उर्वरित शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. याद्यांची छाननी झाली तरी त्याची घोषणा होत नसल्याने लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकºयांमध्ये साशंकता होती. अखेर शुक्रवारी रात्री राज्य सरकारच्या आयटी विभागातून कर्जमाफीची आठवी यादी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाली. यामध्ये २,७९७ शेतकºयांचा समावेश असून, चार कोटी ७८ लाख ५२ हजार रुपये कर्जमाफीची रक्कम आहे. ही रक्कम उद्यापर्यंत जिल्हा बॅँकेच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकºयांच्या हातात पडणार आहे. यामध्ये २,६७२ शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले असून, उर्वरित थकबाकीदार शेतकरी आहेत.
आठव्या यादीतील लाभार्थी असे
कर्जप्रकार शेतकºयांची संख्या लाभाची रक्कम
नियमित परतफेड २६७२ ४ कोटी ३० लाख ८३ हजार
थकबाकीदार ११५ ३६ लाख ६२ हजार
दीड लाखावरील १० ११ लाख ७ हजार
एकूण २,७९७ ४ कोटी ७८ लाख ५२ हजार